आर्वीत साकारणार ३७५ एकरात MIDC, स्थानिकांना मिळणार रोजगार
सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने होणार साकार
धिरज मानमोडे । प्रतिनिधी :
आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रात आजपावेतो उद्योगासाठी कोणतंही मोठी कंपनी किंवा उद्योजक पुढे आला नाही त्याला कारणही तसाच आहे. आर्वीत कापसाची मोठी बाजारपेठ आहे परंतु जिनींग प्रेसिंग व्यतिरिक्त एकही मोठी कंपनी उभी राहू शकली नाही. कारण त्यासाठी असलेली औदयोगिक विकास महामंडळाची जागा ज्याला आपण एमआयडीसी म्हणतो.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी यापूर्वी पाठपुरावा केला नाही कि त्यांची उदासीनता याला कारणीभूत आहे अश्या चर्चाना आता जोर धरू लागला आहे. कारण यापूर्वी उद्योग किंवा एमआयडीसी चा मुद्दा पुढे आला कि नापीक जमीन किंवा जागा उपलब्ध नसल्याने MIDC स्थापित होऊ शकत नाही असा सूर उमट होता.
परंतु आता आर्वी परिसरातील युवकांची चिंता कायमची मिटणार आहे, कारण आता आर्वी मध्ये पावणे चारशे एकरात MIDC स्थापित करण्याला मान्यता देण्यात आली आहे, सदर सविस्तर वृत्त असे कि, मागील डिसेंबर मध्ये आर्वी येथील ज्येष्ठ उद्योजक विजयजी बाजपेयी, राहुल अग्रवाल, विपिन अग्रवाल यांच्या नेतृत्वात आर्वी कॉटन अँड ऑइल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत सुमित वानखडे यांना या संदर्भात निवेदन दिले होते.
त्याचा पाठपुरावा सुमित वानखडे यांनी करून अवघ्या दहा महिन्यात नव्याने MIDC स्थापित करण्याच्या निर्णय घेऊन राज्याच्या उद्योग विभागाने एक रेकॉर्डच केला आहे. या संपूर्ण प्रकरणी सुमित वानखडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उद्योग मंत्री श्री उदय सामंत, उद्योग सचिव श्री हर्षदीप कांबळे, MIDC चे मुख्यधिकारी श्री विपिन शर्मा यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला व आर्वीतील बेरोगारांचा प्रश्न निकाली काढला. त्या अनुषंगाने अनेक वर्षापासून आर्वी येथील MIDC स्थापित करण्याबाबतची आर्वीकरांची मागणी पूर्ण होणार आहे.
परिसरातील कंपनीत होतो कामगारांच्या जीवाशी खेळ!