युवकांनो अपयश पचवायला शिका : माजी आमदार अमर काळे

युवकांनो अपयश पचवायला शिका मा.अमर काळे

आर्वी :  देशातील अल्प वयातील तरुणांच्या वाढत्या आत्महत्या हे चिंतेची बाब आहे अपयश आले म्हणून खचून जाऊ नका  आपल जीवन हे खेळाडू वृत्तीने जगा मैदानावरचा खेळाडू कधी हरत नसतो संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि येणाऱ्या संकटांचा सामना करायला शिका स्व.नंदकिशोर विठ्ठलराव वानखडे माझी सरपंच खडका यांच्या स्मूती प्रित्यर्थ लहानुजी स्पोर्टिंग क्लब खडका द्वारा आयोजीत  भव्य प्लास्टीक बॉल खुल्या क्रिकेट सामन्यांच्या उद्घघाटनीय कार्यक्रमात उद्घघाटक  म्हणून माजी आमदार अमरभाऊ काळे बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडचे अशोकराव पावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र अध्यक्ष अमर वानखडे रामु राठी, दिवाकर वानखडे, प्रमोद ठाकरे ग्रामपंचाय सदस्य संदीप गोरले, रुपराव शेंडे, गजानन इंगळे, सतीश खंडार प्रमुख उपस्तीत होते 

क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तेजस वानखडे सागर वानखडे प्रणय वाघमारे लोकेश वानखडे प्रथमेश वानखडे वैभव वानखडे भुषण वानखडे मनोज वानखडे श्याम वानखडे ऋषिकेश ठाकरे शंतनु कडू सम्मेक वाघमारे ओम वानखडे वेदांत ठाकरे प्रथमेश वानखडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयोग राजनेकर तर आभार अमर वानखडे यांनी मानले
Previous Post Next Post