'शेतकरी व शास्त्रज्ञ परीसंवाद" पशु आरोग्य व व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

'शेतकरी व शास्त्रज्ञ परीसंवाद" पशु आरोग्य व व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

नागपुर :  वसुबारस निमित्त महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी ता. कळमेश्वर जि. नागपुर आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी व शास्त्रज्ञ परीसंवाद" पशु आरोग्य व व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत परसोडी (व), तालुका कळमेश्वर जि. नागपूर येथे दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमात वसुबारस निमित्त सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थ श्री बबनराव पवनकर यांच्या गाय व वासराचे विधिवत पूजन करण्यात आले.  सौ.उषाताई कडू (सरपंच) यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले तसेच श्री. संदिपराव उपाध्ये (उपसरपंच) परसोडी, डॉ. सारीपुत लांडगे वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख आणी श्री. धम्मदीप गोंडाणे (सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक रिलायन्स फाऊंडेशन, नागपुर) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला म.प.म.वि.वि. चे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये डॉ. सारीपुत लांडगे वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख यांनी प्रास्ताविक भाषण देऊन शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या  कार्याबाबत मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. श्री.अमोल हरणे, डॉ. कु.अश्विनी गायधनी, कु. मयुरी ठोंबरे, श्री. तुषार मेश्राम यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. रिलायन्स फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक श्री. धम्मदीप गोंडाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतीविषयक कार्याबद्दल मार्गदर्शन केले. म.प.म. वि. वि. चे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी उपस्थित युवकांना तसेच शेतकरी बांधवांना स्वबळावर तंत्रशुद्ध पद्धतीने पशुधन संवर्धन व दुग्धव्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित केले. 

तंत्रशुद्ध पद्धतीने पशु संवर्धन करण्याकरिता लागणाऱ्या प्रशिक्षणाची आवश्यकता व प्रशिक्षणाचे महत्त्व उपस्थित युवकांना पटवून दिले. तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण मिळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची उपयोगिता शेतकरी बांधवांना स्पष्ट केली. कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन तंत्रशुद्ध पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय करावा याबद्दल मार्गदर्शन केले. शेतकरी व शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रम अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. परसोडी गावातील 100 लिटर दूग्ध उत्पादक युवा शेतकरी श्री. संदीप कडू आणि श्री. सुधाकर कडू या पिता-पुत्र शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

युवा दुग्ध उत्पादक श्री.वामन चोरघडे, श्री. स्नेहल मोहतकरयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल हरणे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी गायधनी यांनी केले.
Previous Post Next Post