'खरीप हंगाम पूर्वतयारी संदर्भात शेतकरी व पशुपालक बांधवाना तंत्रज्ञानाच्या माध्यामातून मार्गदर्शन'
रिलायन्स फाउंडेशन गोंदिया व कृषि विज्ञान केंद्र गोंदिया यांचा उपक्रम
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा गोंदिया व कृषि विज्ञान केंद्र गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १०/०६/२०२१ रोजी डायल आउट ऑडिओ कॉन्फरन्स चे आयोजन गोंदिया जिल्ह्यात करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे आयोजक करोंना आजाराच्या पऱ्शोभूमीवर गोंदिया जिल्यामध्ये लॉकडाऊन असल्या मुळे शेतकरी व पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने यांनी केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ,डॉ. नरेंद्र देशमुख (कार्यक्रम समन्वयक) कृषि वीज्ञान केंद्र हिवरा ,गोंदिया यांनी पशु आहारात अजोला खाद्याचे महत्व , अजोला चा पशु खाद्यामध्ये उपयोग केला तर त्यांचा पशु खाद्य वर होणारा खर्च कमी होईल , व पशुचारा व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. तसेच जनावरांची स्वछता व त्यांच्या गोठ्यातील स्वछता ठेवणे महत्वाचे आहे असे सांगितले तसेच शेती कामे करत असतांना शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर ठेवणे , मास्क वापरणे , स्यानीटायझर वापरणे महत्वाचे आहे असे सांगितले.
श्री. मनोज बोमटे (विषय विशेषज्ञ) कृषि वीज्ञान केंद्र हिवरा ,गोंदिया यांनी धान पिकाची जमिनीची पूर्वमशागत व बीजप्रक्रिया कशी करावी व बीजप्रक्रियेमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या उत्पादनात वाढ करता येऊ शकते त्यामुळे प्रतेकांनी बीज प्रक्रिया करावी असे आव्हाहन शेतकऱ्यांना केले.
श्री. गणेश खेडीकर (विषय विशेषज्ञ – मृदा आरोग्य) कृषि वीज्ञान केंद्र हिवरा ,गोंदिया यांनी शेतकऱ्यांना मातीचा नमूना कसं घ्यावा , माती परीक्षणाचे महत्व यावर संविस्तर मार्गदर्शन केले. ]चंद्रशेखर कोळी ( तालुका कृषि अधिकारी देवरी) बी-बियाणे , खते व औषधे गटाच्या माध्यमातून , कृषि सहाय्यक व कृषि केंद्राशी संपर्क साधावा जेनेण करून त्यांना कमी किमतीत घरपोच बी-बियाणे , खते , औषधे उपलब्ध होईल असे सांगितले .तसेच माती परीक्षण मोफत करायचे असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा असे सांगितले.
श्री चव्हाण विषय विशेषज्ञ –कृषि वीज्ञान केंद्र हिवरा ,गोंदिया यांनी मावा कीड , खोडकिड , व धान पिकाची बीज प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.
तसेच या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील , आमगाव , गोरेगाव आणि गोंदिया येथील १० गावातील 113 शेतकऱ्यांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला व मिळालेल्या माहिती मुळे शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.