राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ
विधीवत बैल तिफण पुजन
अमरावती : मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.मुळचे शेतकरीच असलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांनी देखील रविवारी विधीवत पेरणीचा शुभारंभ केला.
बच्चुभाऊ कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डाँ.नयनाताई कडू यांनी विधीवत बैल तिफण पुजन करून पारंपरीक पध्दतीने पेरणीला सुरूवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे.अशातच सततच्या लाँकडाऊनमुळे खते,बियाणे देखील उपलब्ध होतील की नाही अशी शंका असतानाच लाँकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला.मात्र स्वतः राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू देखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघुन शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भोंगाडे,राहुल म्हाला,संदीप मोहोड,गौरव बोंडे,सतीश मोहोड,मनिष मोहोड,उमेश कपाडे व गोलू ठाकुर आदी उपस्थित होते.