रिलायन्स फाऊंडेशनच्या व्हाट्स अँप सेवेमुळे वाचले दोन एकरातील धानाचे पीक
रविंद्र बाबुराव ताजने (४०) हे ग्राम विठ्ठलवाडा, ता. गोंडपीपरी, जिल्हा चंद्रपूर येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचेकडे चार एकर शेती आहे. ते पारंपारिक पद्धतीने कपाशी आणि धान ही पिके घेतात. सन २०२० च्या खरीप हंगामात त्यांनी दोन एकरात धान आणि उर्वरित दोन एकरात कपाशी या पिकांची पेरणी केली होती. सप्टेंबर महिन्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये त्यांचे दोन एकरामधील धानाचे संपूर्ण पीक सुमारे ४८ तास डुबून राहिले आणि नंतर चिखलात फसून जमिनीवर लोळत राहिले. हे संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या स्थितीत असताना त्यांनी लगेच रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेच्या व्हाट्स अॅप शेतकरी गटात नोंदणी करून तज्ज्ञांन यावर उपाययोजना विचारली. यासाठी रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेचे शेती तज्ज्ञ प्रा. राजेंद्र जाने यांनी रविंद्रला धानाच्या बांधीमध्ये स्वच्छ पाणी सोडून धान पीक हलके धुवून काढण्यास सुचविले. सोबतच त्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करण्याचा आणि युरिया या रासायनिक खताची हलकी मात्रा देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रविंद्रने योग्य पद्धतीने त्वरित उपाययोजना केली. याचा रविंद्रला उत्तम फायदा होवून त्याचे धान पीक एका आठवड्यातच उभे होवून डोलू लागले. अगदी १०० टक्के नष्ट होत असलेल्या या धानापासून त्यांना एकूण २४ क्विंटल धान झाले. त्यांनी ते रु. २१००/- प्रति क्विंटल दराने रु. ५०,४००/- ला विकले. त्यांचे मते, त्यांचे संपूर्ण पीक त्यांना रिलायन्स फाऊंडेशनकडून अगदी वेळेत आणि मोफत मिळालेल्या सल्ल्यामुळे वाचले. त्यामधील ५० टक्के नुकसान गृहित धरल्यास त्यांना सुमारे रु. २५,००० फायदा या छोट्याश्या सल्ल्यामधून झाला.
“माझे धानाचे संपूर्ण पीक पुरामुळे खराब झाले होते व ते चांगले होण्याची शक्यता मला वाटत नव्हती. परंतु, रिलायन्स फाऊंडेशनच्या व्हाट्स अॅप सेवेमुळे मला थेट कृषि शास्त्रज्ञांकडून त्वरित आणि खात्रीलायक सल्ला मिळाला. त्यामुळे मला लवरकरच उपाययोजना करता आली आणि माझे धानाचे संपूर्ण पीक चांगले होवून त्यापासून मला सुमारे २५,००० रु चा फायदा झाला.” - रविंद्र बाबुराव ताजने, ग्राम विठ्ठलवाडा (मो. क्र. ९४२१७८३१०४).