लंपी स्किन (त्वचारोग) पशु चिकित्सा व उपचार यावर पशुपालकांना मार्गदर्शन

युट्यूब लाईव्ह फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून लंपी स्किन (त्वचारोग) पशु चिकित्सा व उपचार यावर पशुपालकांना मार्गदर्शन


रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा गोंदिया, कृषी विज्ञान केंद्र हिवरा, गोंदिया आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर तसेच पशुसंवर्धन विभाग पवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30/9/2020 रोजी लंपी स्किन पशु चिकित्सा व उपचार यावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न करण्यात आले. 

या शिबिराचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन गोंदिया सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.धम्मदीप गोंडाने व जिल्हा कार्यक्रम सहायक श्री. राहुल मेश्राम यांनी केले .
 
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेंद्र देशमुख (कार्यक्रम समनव्यक कृषी विज्ञान केंद्र हिवरा,गोंदिया) , डॉ.सारिपुत लांडगे ( सहाय्यक प्राध्यापक, विस्तार व प्रशिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. आणि डॉ. दिनेश चव्हाण , पशुधन अधिकारी पवनी भंडारा यांनी गोंदिया जिल्ह्यातील पशुपालकांना लम्पि स्किन आजाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले,

सदर कार्यक्रमामधे जनावरांच्या अंगावर गाठी , पायाला सुजन ,लंगडणे , साध्या जखमा , चारापाणी खात नाही , ताप एल.एस.डी आजार या यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ.देशमुख यांनी जनावरांचे चारा व्यवस्थापन या विषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील विविध गावातून अनेक पशुपालकांनी लाईव्ह चॅट च्या माध्यमातून व फोन च्या माध्यमातून प्रश्न विचारून त्यांच्या शंकाचे निराकरण केले.
Previous Post Next Post