अतिमुसळधार ढग फुटी सदृश्य पाऊस शेतकरी हवालदिल मदतीची अपेक्षा
प्रतिनिधी : देवानंद सानप
बुलढाणा : आधी कोरोना मंग लॉकडाऊन मंग दुबार तीबार पेरणी नंतर मुसळधार मंग अतिमुसळधार नंतर ढग फुटी सदृश्य पाऊस त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला लाखोंचे नुकसान मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो पहीले मुग नंतर उडीदाचे पिक सडले पंचनामे फक्त कागदावरच थेट मदत नाहीच शेतकर्यांचा वाल्ही कोण असा थेट प्रश्न आता शेतकरी विचारु लागला आहे.
20 तारखेच्या मध्यरात्री लोणार तालुक्यातील भुमराळा, वझर आघाव, सावरगाव तेली, किनगाव जट्टू, खंडाळा, बिबी, मांडवा, चोरपांगरा, पिंपरी खंदारे, सह तालुक्यातील बहुतांश भागात ढग फुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे राहिलेलं पीक हे पूर्ण जमीनदोस्त झालं .नदी काठच्या गावातील शेतामधील पीक वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.
२० तारखेच्या मध्य रात्री तर पावसाने येवढा हाहाकार माजवला कि नदीच्या पात्रात पावसाचे पाणी बसत नसल्या कारणाने नदी काठच्या जमीनी पिकांसह खरडून गेल्या आहेत. सध्या स्थितीत शेताला तळ्याचे स्वरूप आले असुन त्यामुळे पाण्यात सोयाबीन की सोयाबीन मध्ये पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शेतकर्यांच्या भावना समजून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी कागदावरचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात

