शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी काँग्रेसने नोंदविला निषेध
अमरावती : कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक शहर असलेल्या बेळगाव येथे भाजप सरकार असलेल्या राज्यात स्थानिक प्राधिकरण आणि काही जातीयवादी समाजकंटकांनी सामाजिक तेढ निर्माण व्हावे या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला.
यानंतर संपूर्ण देशात या घटनेचे आणि पूतळा विटंबनेचे तीव्र पडसाद आणि शिवभक्त मंडळी मध्ये तीव्र असंतोष दिसून आला. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे संपूर्ण देशाची अस्मिता आणि श्रद्धास्थान आहे , सोबतच एक उत्तम प्रशासक , स्वराज्य संस्थापक आहेत. मराठी भाषिक बेळगाव येथे मराठी लोकांवर अन्याय होतोच सोबत या घटनेने शिवप्रेमी मंडळींच्या भावना दुखावल्या आहेत.
[ads id="ads1"]
यासंदर्भात आज या घटनेचा निषेध नोंदविताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. सोबतच भाजप नेते, आणि सरकार असलेल्या राज्यामध्ये अनेक वेळा छत्रपती शिवाजी राजे यांचे अवमान करण्याचे प्रसंग आले आहेत.यामुळे देशाची अखंडता आणि एकतेला तडा जातोय.
याबाबत मा.पंतप्रधान भारत सरकार, कर्नाटक येथील मा.मुख्यमंत्री, तथा महाराष्ट्र सरकार यांना याद्वारे शिष्टमंडळाने भावना व्यक्त करत निषेध नोंदविला.याबाबत दखल घ्यावी, सोबतच महापुरुषांच्या पुतळा विटंबना बाबत कठोर कायदा अमलात आणावा तथा आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनातुन तिवसा , अमरावती, भातकुली, मोर्शी तालुका काँग्रेस- तथा तिवसा विधानसभा युवक काँग्रेस ने केली आहे.
यावेळी जेष्ठ जिल्हा काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड, तिवसा नगराध्यक्ष वैभव स वानखडे, भातकुली तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकद्दर खा पठाण, तिवसा तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकूंद देशमुख, जि प सदस्य गजानन राठोड, पं स सदस्य प्रशांत भुयार, खरेदी विक्री संघ अद्यक्ष पंकज देशमुख, माजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश मोरे, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष डॉ रघुनाथ वाडेकर, दिलीप सोनवणे , बंडुभाऊ पोहोकार, युवक काँग्रेसचे अक्षय निचित, रोशन वानखडे, अक्षय सरोदे, रोशन केने, मनीष भुयार आदी पदाधिकारी उपस्थित होते.