कोरोना । देशात समूह संसर्गाला सुरुवात : इंडियन मेडिकल अशोसिएशनचा इशारा

कोरोना । देशात समूह संसर्गाला सुरुवात : इंडियन मेडिकल अशोसिएशनचा इशारा


कोरोना । देशात समूह संसर्गाला सुरुवात : इंडियन मेडिकल अशोसिएशनचा इशारा 

दिल्ली : भारतात कोरोनाचा रुग्ण संख्या दहा लाखांच्या वर गेली असून आता समूह संसर्गाला सुरुवात झाल्याच इंडियन मेडिकल असोसिएशन ने म्हटलं आहे. समोर परिस्थिती भयावह असल्याच सुद्धा आयएमए चे म्हणणे आहे. 

[ads id="ads1"]

भारतात कोरोना वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लोकडाऊन करण्यात आला होता. परंतु देशात दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक असल्याचे आयएमए हॉस्पिटल बोर्ड चे अध्यक्ष डॉ व्ही के मोंगा यांनी म्हटलं आहे. 

शहरा पर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागात सुद्धा पोहचला असून ‘गाव-खेड्यात संसर्ग झाला असून तेथील रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. अशीच संख्या वाढत राहिल्यास तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं कठीण जाऊ शकतं.’ ते म्हणाले की, ‘ दिल्लीमध्ये संसर्ग रोखण्यास आपण सक्षम होतो. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशबद्दल काय बोलणार. या राज्यातील हॉटस्पॉट संख्या आणखी वाढू शकते.
Previous Post Next Post