मुख्यमंत्री दुध प्या व दुधाला भाव द्या.
१ ऑगस्ट पासून राज्यात भाजपाचे अभिनव आंदोलन
भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांची घोषणा
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्षाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी ११ वाजता राज्यव्यापी दुध आंदोलनाची घोषणा आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
अमरावती : महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूष व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परीस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स,स्वीट होम, चहा टपरी, डोमीनोज्स पिज्जा अश्याप्रकारे दुध व दुधाच्या पदार्थाची विक्री करणारे साधने बंद झालेली आहे.
परिणामी २० मार्च २०२० पासून पिशवी पाकिंग दुधाचा खप ३० ते ३५ टक्के पर्यंत पर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुधाच्या प्रोडक्ट ची विक्री १०% ते१५% पर्यंत खाली आलेली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे.
तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दुध प्रती लिटर ३० रु. दराने खरेदी करावे. ह्या सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अंत्यत साध्या पद्धतीने करावे कोणीही दुध रस्त्यावर फेकणार नाही. कोणीही दुधाचा ट्रंकर कोणीही पेटवणार नाही हे आंदोलन शांतेतत पार पडायचे आहे. आपले दुध हे मुख्यमंत्रापर्यंत पोहाचव्याचे आहे तरी सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान सुद्धा भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
