प्रतिनिधी : मयूर वानखडे
आर्वी : तालुक्यातील वर्धमनेरी येथे बस स्टॉप परिसरात कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर युवक दिल्ली येथून आल्याची हिस्ट्री आहे, त्यामुळे सर्व कुटूंब क्वारंटाईन होते. परंतु युवकाच्या वडिलाला दोन दिवसापूर्वी ताप आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णायात दाखल करून त्यांचे स्वाब टेस्ट करण्यात आले होते. तर त्यांचा चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे पुन्हा आर्वी तालुक्यात कोरोनाने खळबळ उडवली आहे.
विशेष म्हणजे दिल्ली वरून येणाऱ्या युवकाची टेस्ट रीपोर्ट येण्यापूर्वीच त्याचे वडील वय ५३ त्यानंच कोरोना लक्षणे आढळून येऊन त्यांचा चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला. सदर युवकाच्या संपर्कातील सर्व कुटुंब आसोलेशन वॉर्डात दाखल केले असून त्यांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे.
वर्धा जिल्हा प्रशासनाने १ दिवस आधीच जिल्हा कोरोना मुक्त झाल्याची घोषणा केली होती. परंतु जिल्ह्यात बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीमुळेच कोरोना शिरकाव करत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.