हमी भावाने चना खरेदीच्या नोंदणीसाठी १४ जुन पर्यंत मुदतवाढ
वर्धा : सहकारी पणन महासंघाच्या वतीने हमीभावाने हरभरा खरेदीसाठी १ मार्च पासुन राज्यात नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. परंतु कोरोना विषाणुचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी २३ मार्च पासुन संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु करण्यात आले. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊच्या कालावधीत शेतक-यांना हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करीता अडचणी आल्या आहेत.
हे लक्षात घेऊन शेतकरी हमी भाव मिळण्या पासुन वंचित राहू नये यासाठी पणन महासंघाने हमी भावाने हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी १४ जुन पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव( पणन) यांनी केले आहे.