यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केले धान्य वाटप !
मोर्शी : सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे. या वर्षी कोरोनामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे महिला बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा वाढदिवस आला व त्यांच्या वाढदिवसाचा खर्च समाजाच्याच कामी यावा असे आव्हान पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी केले होते त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या तर्फे गरजू लोकांना अन्न-धान्य किटचे वाटप करण्यात आले .
संचारबंदीमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये, या विचाराने वरुड तालुक्यातील गरजू कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदत करण्यात आली. परंतु ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे अंमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काहीं दिवसांपासून शहरात संचारबंदी असल्याने मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना घरीच बसून रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.
यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेऊन महिला बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना अन्न धान्य व जीवनश्याक वस्तूंचे वाटप करून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत वरुड तालुक्यातील गरजु नागरिकांना धान्य व जीवनश्याक वस्तूंचे वाटप करण्यात आले
‘कोरोना’ विषाणूमुळे जगात हाहाकार उडालेला आहे. तुम्ही-आम्ही सर्वजण घर नावाच्या स्वर्गामध्ये सुरक्षित आहोत. परंतु ज्यांचे आभाळ फाटलेले आहे आणि कसल्याही प्रकारचा त्यांना सहारा नाही अशा लोकांची काळजी घेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी अशा लोकांच्या पोटामध्ये प्रेमाचे चार घास घालण्यासाठी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्य अन्नदानयज्ञाची सुरुवात केली आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस हा महत्त्वाचा दिवस असतो मात्र सध्या कोऱोणा या महाभयंकर संकटाशी सामना करत असताना अधिक काळ संचारबंदी व जमाव बंदी असल्याने समाजातील गोरगरीब व्यक्तींना अन्नधान्या बरोबरच जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत असल्याने पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार देवेंद्र भुयार यांनी अन्न धान्य व जीवनश्याक वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार , राजेंद्र बहुरूपी जिल्हा परिषद सदस्य , महेंद्र देशमुख नगरसेवक, ऋषीकेश राऊत उप जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना , कृष्ण सोनारे , तुषार अकर्ते निखिल बनसोड , संजय चक्रपाणी , शमयु काझी , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .