सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मजूर आपल्या गावी रवाना
प्रतिनिधी अमित इंगळे :
तळेगाव आष्टी महामार्ग च्या कामावर कर्तव्यरत असलेले काही मजूर आपल्या गावी जाण्यासाठी कंपनीला रजा अर्ज केला. आर आर काँट्रॅक्शन कंपनी ने त्यांना मनाई केली. मजुरांना आपल्या गावी जायचं असल्याने त्यांनी कंपनीला मागणी केली. व त्यांनी आपला हिशोब करत आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी अर्ज केला.
सदर अर्ज काही कारणास्तव नामंजूर झाल्याने त्यांची राहण्याची व खाण्या पिण्याची चिंता वाढली अश्यातच त्यांनीं आष्टी येथील समाजसेवक व उर्स कमेटीचे अध्यक्ष आवेज खान यांची भेट घेत मदत करण्याची मागणी केली. आवेज खान यांनी आपल्या सहकारी उस्मान बेग,प्रज्वल चोहाटकर ,अविनाश कदम,दानिश शेख,सलमान खान,यांच्या साहयाने संस्थान च्या सभागृहात त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत त्यांना मदतीचा हात दिला.
दुसऱ्या दिवशी त्यांची राहण्याची व खाण्या पिण्याची व्यवस्था आवेज खान,निलेश जयस्वाल,अमितभाऊ इंगळे,शेखर सत्पाळ,राजू शहा,नितीन डोईफोडे ,जगदिश जयस्वाल व इतरांनी त्यांची व्यवस्था केली.आवेज खान व सहकाऱ्यांनी त्यांना जाण्यासाठी ऑनलाइन परवानगी दाखल करत त्यांना परवानगी काडून दिली व गाड्यांची व्यवस्था करत गावी जाण्यासाठी त्यांना रवाना केलं.
आपल्या गावी परत जातांना मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मजूर आपल्या गावी परत जाताना सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना सोबत नाश्त्याची व्यवस्था करून दिली. महाराष्ट्र च्या जनते कडून मिळालेल्या सहकार्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.