आमदार भुयार यांनी पाणी पुरवठ्याच्या कामाकरिता उपलब्ध करून दिला निधी !

आमदार देवेंद्र भुयार


आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणी पुरवठ्याच्या कामाकरिता उपलब्ध करून दिला निधी !

१५ मे पर्यंत मंजूर कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ! 

मोर्शी :
                भविष्यात मोर्शी वरुड तालुक्याला टँकरमुक्त करण्यासाठी  विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्या. मोर्शी येथील उप विभागीय कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार , उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले , नगराध्यक्षा मेघना मडघे , तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे, यांच्यासह विविध विभागाचे आदी अधिकारी उपस्थित होते.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामीण पाणी पुरवठा विभागमधून पाणी टंचाई सन २०२० चा उन्हाळा अंतर्गत मंजूर करण्यात आली असून मजूर कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे पाणी टंचाई कामामध्ये कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले

              नागरिकांना पाणी मिळावे म्हणून पाणी टंचाई कामाकरिता बाबुळखेडा येथील पाणी टंचाई कामाकरिता १५ लक्ष ४४५० रुपये , एकदरा येथील कामाकरिता ३लक्ष ८८८०० रुपये , चांदस येथील कामाकरिता ५ लक्ष ५०४०० रुपये  ,चिंचरगव्हाण येथील कामाकरिता १ लक्ष २१८०० रुपये ,वाई खुर्द येथील कामाकरिता १लक्ष ८३५०० रुपये , रोषणखेडा येथील कामाकरिता ३लक्ष ५५०० रुपये  , कुरळी येथील कामाकरिता ८लक्ष ३३१०० रुपये , देऊतवाडा येथील कामाकरिता ९लक्ष १८८०० रुपये , घोराड येथील कामाकरिता १८लक्ष ४०२०० रुपये  , नांदगाव येथील कामाकरिता ९लक्ष ४८६० रुपये , इसंबरी येथील कामाकरिता ८लक्ष ७३४६० रुपये ,  , तिवसाघाट येथील कामाकरिता ४ लक्ष ७५१९० रुपये , झटामझिरी येथील कामाकरिता ११ लक्ष ३४१८० रुपये ,  पळसवाडा येथील कामाकरिता ९लक्ष २२४६० रुपये , कोळविहीर येथील कामाकरिता ४ लक्ष ९९३०० रुपये वरील गावातील कामे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामीण पाणी पुरवठा विभागमधून पाणी टंचाई सन २०२० चा उन्हाळा अंतर्गत मंजूर करण्यात आली असून मजूर कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे पाणी टंचाई कामामध्ये कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी  वरुड तालुक्यातील आवश्यक असलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या .
         
          यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठा, चारा टंचाई, दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, नरेगाअंतर्गत सुरू असलेली कामे आदींचा आढावा घेतला. मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच कामांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने आणि जलदगतीने करून १५ मे पर्यंत मंजूर कामे पूर्ण करावी अश्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिका-यांना देण्यात आले. बैठकीला आमदार देवेंद्र भुयार , नगराध्यक्षा मेघना मडघे , उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले , तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे , यांच्यासह  विविध विभागाचे अधिकारी, संबंधित  अधिकारी, नगर पालिका मुख्याधिकारी गीता ठाकरे आदी उपस्थित होते.


Previous Post Next Post