अखेर अक्षय तृतीया ला भेंडवळ मांडणी करीत भाकित वर्तविले

अखेर अक्षय तृतीया ला भेंडवळ मांडणी करीत भाकित वर्तविले
३५० वर्षाची भेंडवल भविष्यवाणी परंपरा अखंडित सुरु ठेवली 
४ लोकांनीच केली घट मांडणी व केले वर्षभरातील भाकित

बुलडाणा  : जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यानी पुढील वर्षाचे भाकित वर्तविले आहे. 

कोरोना च्या पार्षभूमिवर यावर्षी भेंडवळ घट मांडणी होणार नाही असे जाहिर करण्यात आले होते , मात्र ही 350 वर्षाची परंपरा खंडित होउ नये यासाठी राज्यभरातील शेतकरयानी व नागरिकांनी सारंगधर महाराज यांना फोन द्वारे विनंती केली त्यानुसार केवळ चंद्रभान महाराज यांचे वंशज सह चार लोकांनी अक्षय तृतीयला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केल्या गेली व आज सकाळी सूर्योदय पूर्वी त्या घट मांडनीचे निरीक्षण केल्या गेले त्यानुसार यावर्षिचे भाकित वर्तविल्या गेले आहे 
व्हिडिओ बघा : 



वर्तविलेल्या भाकितामद्धे :

यावर्षी चारही महिन्यात पावसाळ सर्वसाधारण व चांगल्या स्वरुपात राहिल , अतिवृष्टि सुद्धा होईल महापुर येतील 
पृथ्वी वर नैसर्गिक व रोगराई चे संकट येईल त्यामुळे देशातील आर्थिक स्थिति सुद्धा कमकुवत होईल 
राजा कायम आहे मात्र आर्थिक स्थिति खालावल्यामुळे राजा वर तनाव वाढेल 

पिक -  ज्वारी, तुर, गहु कपाशी, सोयाबीन सर्व पिक चांगले येतील पहिल्याच महिन्यात पिक पेरणी केल्या जाईल , चारा टंचाई भासेल, जामिनीतिल पाण्याची पातळी वाढेल पाऊस चांगला असल्याने जमिनीतिल पाण्याची पातळीत वाढ होईल असे सर्वसाधारण भाकित सारंगधर महाराज महाराज यानी वर्तविले आहे 

Previous Post Next Post