देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार साहेब उर्फ जाणता राजा आता पर्यंत होते कुठे? भाजपा सरकार ला सत्तेवर येऊन ३ वर्षे झाले, आणि या तीन वर्षात सरकारच्या कोणत्या कोणत्या शेतकरी विरोधी धोरणा विषयी तळमळीने आवाज उठविला असे ऐकविण्यात आले नाही.
खरे म्हणजे नवीन सरकार सत्तेवर आल्यावरच एका वर्षातच आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली.
भांडवल शाहीच्या बाजूने व शेतकरी विरोधी आपले धोरण राबवत या सरकारने आपले एक एक पाऊल पुढे टाकत शेती व शेतकऱ्यांची वाट लावली.
एकीकडे शेतीतून उत्पादन नाही तर दुसरी कडे शेतमालाला भाव नाही या दुय्यम कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला या भाजपा सरकारने आत्महत्या करण्याचाच पर्यायी मार्ग दिला असा म्हणायला वावगं ठरणार नाही त्यावेळेस हेच जाणता राजा कुठे होते .?
शेतकऱ्यांना कर्जमाफी चे गोंडस गाजर दाखवून त्याला गोजविण्याचा प्रयन्त केला. परंतु प्रत्येक्षात त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी चे फॉर्म भरण्यापासून ते त्याच्या खात्यावरील कर्जमाफी साठी चा त्याचा त्रास हा त्या शेतकऱ्यालाच माहिती? असं असूनही कर्जमाफी फक्त कागदोपत्रीच आहे.. त्यावेळस हे जाणता राजा कुठे होते?
बोण्डअळी मुळॆ त्रस्त झालेल्या कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी हे पीक वाचविण्यासाठी असंख्य फवारण्या केल्या परंतु पीक तर वाचलेच नाही, पण जीव मात्र गेला. शासनाच्या नाकर्ते पणा मुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांना जीव गमवावा लागला त्यावेळस हे जाणता राजा कुठे होते?
आणि आता इतक्या दिवसा नंतर विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले साहेब मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाला आणि मुलीला त्यांच्या संस्थेवर नौकरी व शिक्षण देणार? बोन्डअळी चा प्रकोप हा सदोष बियाण्या मुळे झाला हे शेतीची जाण असणाऱ्या "जाणता राजांना" इतक्या दिवसा नंतर जाण व्हावी याचे आश्चर्य म्हणावे लागेल?
विरोधी असो कि सत्ताधारी शेतकऱ्याच्या वाली कोणीच नसतो फक्त निवडणूक आल्या कि राजकारण पुरते शेतकरी शेतकरी करत फिरायचे असा काहीसा प्रकार भारतात पाहावयास मिळत आहे.
तरी पण महाराष्ट्रातील शेतकरी या "जाणता राजा" कडे आतुरतेने आपल्या हितासाठी काहीतरी करेल या आशेने आजही बघत आहे. मला वाटते साहेब या शेतकऱ्यांना पाठ दाखवणार नाही व आजही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत हे सिद्ध करून दाखवेल..
-धिरज मानमोडे
मुख्य संपादक, कृषीप्रधान टीव्ही