जिल्ह्यात पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, नुकसान भरपाई मिळणार ?
वर्धा : जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्धा जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
याबाबत आज भाजपाचे वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी एकूण वस्तुस्थितीची माहिती व पुढील रब्बी लागवडी अगोदर करावयाच्या उपायोजना यासाठी वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक प्रभाकर शिवणकर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळवून देता येईल याबाबत विस्तृत चर्चा झाली.
या भेटी मुळे आता कृषी विभाग शासन दरबारी नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करेल यात शंका नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आशा आहे कि येणाऱ्या दिवाळी पूर्वी नुकसान भरपाई मिळेल.