भव्य राज्यस्तरीय कृषी महोत्सव १२ ते १६ जानेवारी २०२३ ला
अमरावती : येथील सायन्सकोर मैदानात येत्या १२ जानेवारी पासून पाच दिवसीय कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा व जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या स्वाभिमान कृषी महोत्सवाची तयारी ला शुक्रवार पासून सायन्सकोर मैदान येथे सुरुवात करण्यात आली.
या मैदानावर एक लाख चौरस फुटांचा भव्य दिव्य तीन मंडपात कृषी महोत्सव साजरा होणार आहे या मंडपाचे युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले.
दिनांक 12 जानेवारी ते 16 पर्यंत चालणाऱ्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कृषी नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहे.
कृषी महोत्सवात संपूर्ण जिल्ह्यासह विदर्भातील नागरिकांना आनंदाची पर्वणी राहणार आहे. महोत्सवात आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन युवा स्वाभिमान पार्टी व शांती इव्हेंट मॅनेजमेंट च्या वतीने करण्यात आले असून डिजिटल न्यूज मीडिया पार्टनर म्हणून कृषी प्रधान टीव्ही आहे.
सोबतच्या ज्या कृषी उत्पादक निर्माते यांना या महोत्सवात स्टॉल घ्याचा असल्यास त्यांनी जयंत कौलगीकर : 9922427794 व सत्यजित सावंत : 9923555733 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनात येऊन विविध शेती उपयोगी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.