फोटो नाही नीट म्हणून नाही मिळाले दिवाळीचे शिधा किट : ॲड. यशोमती ठाकूर
शिधावाटपावरून काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे ''इडी' सरकारला खडेबोल
अमरावती: दिवाळी सण ऐन तोंडावर आला असतांना दुकानांमध्ये शिधावाटपांच्या पिशवीवर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे फोटो नाहीत म्हणून सामन्यांना दिवाळी किट पासून वंचित राहावे लागत आहे, विद्यमान सरकार केवळ राजकारणासाठी सामान्यांची भावनिक तसेच आर्थिक थट्टा करत आहे असे आरोप करीत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 'इडी' सरकारवरती हल्लाबोल केला.
तसेच पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली जात असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनदेखील पैसे पोहचले नाहीत असं त्या म्हणाल्या. आम्ही देखील सरकारमध्ये होतो, अशी संकटं आम्ही पण पहिली आहेत असे म्हणत दिवंगत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा दाखला देत तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांप्रती कशाप्रकारे तत्त्परता दर्शवली याचे उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिले.
फक्त 'बोलाची कडी अन बोलाचा भात' या वृत्तीचे हे सरकार आहे असे म्हणत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ''इडी' सरकारवरती टीकास्त्र सोडले.