प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी - ३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे
अमरावती : सन 2022-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे.
शासनाच्या ई- पिक मध्ये पिक पेऱ्याची नोंद 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असतांना काही वेळेस विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक यामध्ये तफावत आढळुन शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहु नये यासाठी शेतकऱ्यांने पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतीम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाकडुन घेण्यात आला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेतांना ई- पिक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र दि. 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पिक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक के. एस मुळे यांनी केले आहे.
