चार चाकी गाडी पलटी होऊन अपघात
राजेंद्र खंडारे (प्रतिनिधी) -
तळेगाव शा.पंत. - नागपूर येथून पुणे हडपसर येथे जात असलेली फोर्ड कंपनीची महागडी गाडी क्र.एम एच 12 क्यू एफ 7877 या नंबरची गाडी विरुद्ध दिशेने जात पलटी झाली.
सविस्तर वृत्त असे की पुणे हडपसर येथील रहिवासी शिवम गुप्ता वय 19 वर्ष, रंजना गुप्ता वय 40 वर्ष,कू.स्नेहल गुप्ता वय 16 वर्ष हे तीन व्यक्ती नागपूर येथे काही कामा निमित्त आले होते त्यांचा परतीचा प्रवास सुरू असताना तळेगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत येणाऱ्या चिस्तूर् जवळ रोड वरती काही तरी गाडीला आडवे आले असता गाडीने विरुद्ध दिशेला असलेल्या रोड वरती जात पलटी झाली.
यामध्ये प्रवास करणाऱ्या गुप्ता कुटुंबाला किरकोळ मार लागला.सुदैवाने यात कोणतीही जीव हानी झाली नाही मात्र महागड्या गाडीचे खूप नुकसान झाले.यावेळी जखमींना तळेगाव येथील पोलिसांनी जवळच्याच दवाखान्यात नेत उपचार करून घेतले.या घटनेचा पुढील तपास जमादार राजेश साहू,अमोल मानमोडे,राहुल अमूने हे करीत आहे.