आज सकाळी सापडले सहा म्रुतदेह
जाग्यावरच पंचनामा, पोष्टमार्टम व अंत्यविधी करण्याचे एसडीएम हिंगोले यांचे आदेश
अतुल दंढारे : प्रतिनिधी
आज १६ सप्टेंबर ला सकाळी सापडलेल्या सहा म्रुतदेहाचे पंचनामे पोष्टमार्टम व दफन करण्याचे जाग्यावरच करण्याचे आदेश एस डी एम नितिनकुमार हिंगोले यांनी केले आहे
वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना परवा सकाळी घडली. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह परवा सापडले होते एन डी आर एफ व एस डी आर एफ व आपत्ती व्यवस्थापन कमांडो यांना युद्धपातळीवर केलेल्या शोध कार्यात आज यश आल्याची माहिती एस डी एम नितिनकुमार हिंगोले यांनी कृषीप्रधान टीव्हीला दिली घटनास्थळा पासून पाच किलोमीटर दुर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी सहा शव मिळाले आहे व इतर दोन शव सुध्दा मिळेल असे एसडिएम हिंगोले म्हणाले . आज पहाटे सापडलेल्या मृतदेहाचा जागेवरच पंचनामा, पोष्टमार्टम,व अत्यंविधी करण्याचे आदेश एस डि एम नितिनकुमार हिंगोले यांनी दिले आहे
काल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध व बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते, जिल्हा शोध व बचाव पथक , राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची पथके कालपासून शोधकार्य करीत होते . पोलिस अधिकारी मिलिंद सरकटे वरुडचे ठाणेदार प्रदीप चॊगावकर, , तहसीलदार नंदकीशोर घोडेस्वार , ग्रामसेवक , तलाठी एस के गोलवाल, मासेमार तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी मदतकार्य करीत होते
आज सकाळी जे म्रुतदेह सापडले त्यात कु निशा नारायण मटरे,पियुष मटरे,अतुल वाघमारे व त्याची पत्नी ऋषाली वाघमारे व सॊ अश्विनी खंडागळे व सॊ पुनम शिवणकर आहेत व इतर दोन म्रुतदेह सापडतील असे एसडिएम हिंगोले यांनी सांगितले