आर्वी : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पालीवाल झेरॉक्स वर रेल्वे पोलिसांची रेड
वर्धा : रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर रेल्वे मुख्यालयाच्या आदेशानुसार व निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी सापळा रचून आर्वी येथील रेल्वे तिकिटांचा अवैध धंदा करणाऱ्या पालीवाल झेरॉक्स दुकानावर रेल्वे पोलिसांनी धाड टाकून तिकिटांचा अवैध धंदा करणाऱ्या श्री पालीवाल यांना अटक केली सदरची कारवाई वर्धा रेल्वे मुख्यालयाच्या आदेशानुसार व निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ वर्धा एसआय विनोद मोरे, कॉन्स्टेबल अमित बारापत्रे, भरत राठोड, मंगेश दुधाने, यांनी केली
सदर कारवाई मध्ये त्यांनी
1) 08 Live ई टिकिट कीमत 7414/-
2) प्रवास समाप्ति चे E reservation ticket एकुण 166 नग कीमत 109357/- रुपये
3) एकूण 174 नग ई टिकिट एकूण कीमत 116771/- जे वेगवेगळ्या पर्सनल यूजर id वरून तयार केले गेले होते, तसेच कंप्यूटर सेट व एक मोबाइल एकूण कीमत 35000/- रुपये चे मुद्देमाल जप्त केला आहे.
वर्धा येथील आरपीएफ पोलिस ठाण्यात आरोपी अमित जुगलकिशोर पालीवाल रा. आर्वी जिल्हा वर्धा याला या प्रकरणात अटक करण्यात आली; आणि त्याच्याविरूद्ध सीआर 332/2021 U/s 143 Rly Act कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विनोद मोरे हे करीत आहेत.