भाईपुरात कोरोना टेस्ट कॅम्प
मोर्शी : तालुक्यातील भाईपुर इथं स्थानिक ग्रामपंचायतिच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते अंकुश बनसोड व प्रकाश राऊत यांनी १८ मार्च रोजी "कोरोना चाचणी" शिबीर आयोजित केल होतं.या शिबिरात येथील ६५ पेक्षा नागरिकांनी चाचणी करून घेतल्या.
कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पृष्ठभुमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांनी याला रोखण्यासाठी "कोरोना चाचणीचा" करण्याला वेग दिला आहे. दरदिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असल्यामुळं चिंता वाढली आहे.
"आरोग्य यंत्रणा टेस्ट वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलं तरी याबाबत जनजागृती होणं आवश्यक असल्याच मत तज्ञ व्यक्त करीत असल्यामूळ ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना टेस्ट करणं अधिक सुलभ व्हावं या "सामाजिक भावनेतून भाईपुरचे सरपंच श्रीमती जया राऊत,व सामाजिक कार्यकर्ते अंकुश बनसोड, प्रकाश राऊत यांनी पुढाकार घेऊन या शिबिराच आयोजन केल.
यासाठी हिवरखेड आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ वानखडे,जि. प शाळेचे मुख्याध्यापक चर्जन,श्री पोटे,श्रीमती शीला राऊत ग्रामपंचायत सचिव पांचाळे यांचे सहकार्य लाभले.