धामणगाव नगर परिषद ऍक्शन मोडवर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे रस्त्यावर, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
सलमान खान (प्रतिनिधी) :
धामणगाव : शहरात वाढत्या रुग्णांची संख्या पाहून दररोज पाच नंतर सुरू असलेल्या दुकानावर कारवाई होणार असून विना माक्स व अधिक प्रवासी असलेल्या ऑटो रिक्षा चार चाकी गाडीवर कारवाई न केल्यास नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे निर्देश धामणगाव रेल्वे नगर परिषद व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिले आहे.
धामणगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे पोलीस प्रशासन व नगरपरिषदच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे मात्र नगरपरिषद कर्मचारी जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे दिवसभर शहरात एकाद्या दुकानावर गर्दी दिसली तर या दुकानाना सील करणे गरजेचे आहे नेमलेल्या पथकाने ही कारवाई करणे महत्त्वाचे आहे ही कारवाई योग्य पद्धतीने झाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी सांगितले दरम्यान आज सायंकाळी स्वतः मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी स्वतः रस्त्यावरून येणाऱ्या विना माक्स असलेल्या वाहन धारकावर कारवाई केली दरम्यान आमदार तथा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नगरपरिषद च्या सर्व विभागाची आज ऑनलाईन बैठक घेतली धामणगाव शहरी कुणाही परिस्थितीत कोरोणा मुक्त व्हावे यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे असेही त्यांनी ऑनलाइन बैठकीत सांगितले.