ग्राम स्‍वराजची आधारशिला यावर ‘वर्धा मंथन’ चे आयोजन6-7 फेब्रुवारीला : प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल

ग्राम स्‍वराजची आधारशिला यावर  ‘वर्धा मंथन’ चे आयोजन
6-7 फेब्रुवारीला : प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल

वर्धा: देशात सद्यस्थितीत आत्‍मनिर्भर भारताच्‍या निर्मितीकरिता बहुविध प्रयत्‍न केले जात आहेत. आत्‍मनिर्भर भारत निर्मित करण्‍याचा मूळ विचार हा गांधीजींच्‍या ग्राम स्‍वराजच्‍या रचनात्‍मक कार्यक्रमांमध्‍ये अंतर्भूत आहे. 

आत्‍मनिर्भर भारताकरिता आत्‍मनिर्भर गाव तर आत्‍मनिर्भर गावाकरिता आत्‍मनिर्भर व्‍यक्ति आवश्‍यक आहे. आत्‍मनिर्भर भारत निर्माण करण्‍याकरिता समकालीन ग्राम विकासाच्‍या संदर्भात गांभीर्याने विचार-मंथन करण्‍याची गरज आहे. विविध संघटना आणि  सामाजिक कार्यकर्ते यांनी गेल्‍या सात दशकांपासून ग्राम विकासाकरिता रचनात्मक कार्य केले आहे. त्‍यांचे अनुभव एकत्रित करणे तसेच त्‍यासंबंधी एक प्रारूप तयार करण्‍यासाठी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धा च्‍या वतीने श्‍यामा प्रसाद मुखर्जी अकादमिक भवनातील कस्‍तूरबा सभागृहात 06 व 07 फेब्रुवारी 2021 ला एक राष्‍ट्रीय कार्यशाळा ‘वर्धा मंथन-2021’चे आयोजन केले आहे. 
ही माहिती महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी आज (बुधवार) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. ते म्‍हणाले की कार्यशाळेचे  उद्घाटन 06 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. होईल. यावेळी केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि  सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्यम मंत्री श्री नितीन गडकरी, महात्‍मा गांधी केंद्रीय विश्‍वविद्यालय, मोतिहारी (बिहार)चे कुलाधिपती तथा खादी व ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्‍यक्ष,  डॉ. महेश शर्मा, वर्धेचे खासदार श्री रामदास तडस तथा विनोबाजींचे सचिव राहिलेले बालविजय भाई भाग घेतील.  उद्घाटन सत्राच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील.  

कुलगुरु प्रो. शुक्‍ल यांनी सांगितले की उद्घाटन सत्रानंतर 06 फेब्रुवारीला दुपारी  एक ते दोन वाजेदरम्‍यान ‘ग्राम विकासाचे देशज प्रयोग’ या विषयावर, दूसरे सत्र साडे तीन पासून पाच वाजेपर्यंत ‘शेती’ विषयावर, तीसरे सत्र सायंकाळी साडे पाच पासून साडे सहा पर्यंत ‘कारागिरी’ या विषयावर आयोजित करण्‍यात येईल. कार्यशाळेच्‍या दूस-या दिवशी 07 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा ते  साडे 11 वाजेपर्यंत ‘स्वच्छता व आरोग्‍य’ यावर, पाचवे सत्र दुपारी 12 ते दिड दरम्‍यान ‘धर्मपाल यांची भारतीय दृष्टी’ या विषयावर तर सहावे सत्र दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ‘विश्‍वविद्यालयांमध्‍ये गांधी अध्ययनाची दिशा’ यावर आयोजित करण्‍यात येईल.

कुलगुरु प्रो. शुक्ल म्‍हणाले की विविध तांत्रिक सत्रांमध्‍ये देशभरातील प्रतिष्ठित कार्यकर्ते आणि प्रतिनिधी ऑफलाइन व ऑनलाइन माध्‍यमातून विचार-विमर्श करतील. कार्यशाळेत प्रत्‍यक्षपणे सहभागी होतील- सर्वश्री देवाजी तोफा (मेंढा लेखा, गडचिरोली),  सुनील देशपांडे (मेळघाट, अमरावती),  मोहन हीराबाई (मेंढा लेखा),  डॉ.  सुधीर लाल (इंदिरा  गांधी  राष्ट्रीय  कला केंद्र,  नवी  दिल्ली),  बसंत सिंह  (नवी दिल्‍ली),  पोपटराव पवार (हिवरे बाजार),  रवि गावंडे (यवतमाळ),  लोकेंद्र भाई (खादी बिरादरी,  पुणे), दिलीप केळकर (मुंबई),  आशीष गुप्ता (जबलपूर), रूपेश पाण्डेय (वाराणसी), डॉ. आर. के. पालीवाल,  राकेश दुबे,  डॉ. हबीब, विवेक कटारे (भोपाळ), संजय सराफ़,  अनिल सांबरे,  विशाखा राव,  सचिन देशपांडे,  श्रीप्रकाश पाठ्या,  (नागपुर), प्रो. अर्चना सुरेश स्याल (हरिद्वार), उल्हास जाजू (वर्धा) तर ऑनलाइन माध्‍यमातून कार्यशाळेत सहभागी होतील - पद्मश्री अशोक भगत (झारखंड), श्री अजीत महापात्र (अखिल भारतीय गोसेवा प्रमुख), श्री अभय महाजन (दीनदयाल शोध संस्थान, चित्रकूट), डॉ. गीता धर्मपाल, श्री पवन गुप्ता (मसूरी), श्रीमती इंदुमती काटदरे (अहमदाबाद) आणि श्री राजकुमार भाटिया (दिल्ली).
प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी सांगितले की दोन दिवसाच्‍या कार्यशाळेचा समारोप रविवार, 07 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.15 वा. होईल. यावेळी मुख्‍य अतिथी म्‍हणून शिक्षण तज्‍ज्ञ आणि माजी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री  प्रो. मुरली मनोहर जोशी ऑनलाइन उपस्थित  राहतील. विशेष उपस्थिती इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र, नवी दिल्‍लीचे सदस्‍य सचिव प्रो. सच्चिदानंद जोशी यांची राहील.  समापन सत्राच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल राहतील. 
कुलगुरु म्‍हणाले की वर्धा गांधीजींच्‍या रचनात्मक कार्यांची प्रयोग-भूमी राहिलेले आहे. म्‍हणून ही राष्ट्रीय कार्यशाळा येथे आयोजित करण्‍यामागील मोठे कारण आहे. उन्‍नत भारत अभियान यासारख्‍या विविध कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातूनही विश्‍वविद्यालय अनेक गावांमध्‍ये ग्रामीण विकासाशी निगडित रचनात्मक भूमिका पार पाडत आहे. विश्‍वविद्यालयाने वर्धेतील दहा गावे दत्‍तक घेतली आहेत. अशा गावांमध्‍ये विद्यार्थी आणि शिक्षक ग्रामीण नागरिकांसोबत  त्‍यांच्‍या समस्यांवर चर्चा करुन उपाय करण्‍याचे मार्ग सूचवितात. या दोन दिवसीय कार्यशाळेची समस्‍त कार्यवाही ई-पुस्‍तक रूपाने ‘वर्धा संकल्‍प’ शीर्षकाने समारोप सत्रात जारी करण्‍यात येईल.
Previous Post Next Post