पंचनामे न केल्यामुळे सोयाबीन पीक अजूनही उभेच, युवा शेतकऱ्यांने दिला आत्महदनाचा इशारा
आर्वी : तालुक्यातील जळगांव बेलोरा येथील युवा शेतकरी मनोज पन्नासे यांनी सहा एकर शेती मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती, परंतु खोडकिडींचा प्रादुर्भाव झाल्याने आलेले पीक होत्याचे नव्हते झाले, संपूर्ण सोयाबीन ला एकही दाना नसल्याने त्यांनी सोयाबीन सोंगलेच नाही आणि आजही ते पीक शेतात तसच उभं आहे , कारण खोडकीच्या प्रादुर्भाव होऊनही एकही लोकप्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे व महसूल विभागाच्या लोकांनी पाहणी केली नाही आणि ज्या कंपनीचा विमा काढला, त्या पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी सुद्धा इकडे फिरकला नाही, त्यामुळे आज मनोज पन्नासे यांनी दरसऱ्याचा अलटीमेटम देऊन प्रशासनाला मीडिया मार्फत आत्महदहनाचा इशारा दिला आहे. जो पर्यंत पंचनामे करून विमा कंपनी कडून नुकसान भरपाई होत नाही तो पर्यंत शेतातील सोयाबीन पीक असच उभं राहिलं असा इशारा ही यावेळी दिला
रब्बी पिकांच्या पूर्व मशागती साठी पैसाच नाही
खरीप पिकांचे संपूर्ण होत्याचे नव्हते झाल्याने आता शेतकरी चिंतातुर झाला आहे काढलेलं पीक कर्ज कसे भरायचे आणि रब्बी पिकाची पूर्व मशागत कशी करायची या विवंचनेत शेतकरी मनोज पन्नासे सापडला आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल न घेतल्यास येत्या दसऱ्या पर्यंत पंचनामे न केल्यास होणाऱ्या आत्महदहला सर्वस्वी कारणीभूत जिल्हा प्रशासन राहील असा इशारा सुद्धा युवा शेतकरी मनोज पन्नासे यांनी दिला आहे
व्हिडीओ बातमी पहा : कृषीप्रधान टीव्हीवर