लंपी स्किन ( त्वचारोग ) पशु चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न

वडगाव व पवनी येथे लंपी स्किन ( त्वचारोग ) पशु चिकित्सा व उपचार शिबिर संपन्न

रिलायन्स फाऊंडेशन चंद्रपूर यांचा उपक्रम
पशुसंवर्धन विभाग चंद्रपूर व रिलायन्स फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 9/9/2020 रोजी व 10/9/2020 रोजी वडगाव व पवनी ता. वरोरा जि. चंद्रपूर येथे लंपी स्किन पशु चिकित्सा व उपचार शिबीर संपन्न करण्यात आले. 

        या शिबिराचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन चंद्रपूर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी श्री. अमित मेश्राम यांनी केले .व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मा. डॉ . अविनाश सोमनाथे आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मांढेळी डॉ. एस.के. अघडते. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले . 
सदर  शिबिरामध्ये जनावरांच्या अंगावर गाठी , पायाला सुजन , लंगडणे , साध्या जखमा , चारापाणी खात  नाही , ताप एल.एस.डी आजार या प्रकारचे जनावरे शिबिरामध्ये आली होती. 

वरील आजारावर सर्व जरावरांची तपासणी करून औषधी उपचार करण्यात आला यामध्ये लंपी स्किन आजारामुळे ग्रस्त असलेली जनावरे यांना उपचार करण्यात आले . तसेच स्तर आजारांवर सुद्धा उपचार व लसीकरण करण्यात आले. ऐकून 300 हुन अधिक जनांवारांचा उपचार करण्यात आले . गावामध्ये पशुपालकांच्या  गोठ्या मध्ये जंतू नाशक औषधी फवारणी करण्यात आली . रिलायन्स फाऊंडेशन मुळे राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामपंचायत तर्फे त्याचे कौतुक करून अभिनंदन पत्र देण्यात आले . 

या शिबिरामध्ये पशु वैद्यकीय दवाखाना येथील मा . डॉ. अविनाश सोमनाथे  ,डॉ .एस.के.अघडते ,  डॉ .व्हि.एम.मांदूरे ,   श्री.आर.के . मोगरे , श्री. एस.बी.मेश्राम  व श्री. आर.बी.वाघ यांच्या उपस्थित जनांवरावर औषधी उपचार केले .
Previous Post Next Post