भुमराळा, वझर, शिवारात पंचनामे सुरू ओला दुष्काळ कधी जाहीर करणार?
प्रतिनिधी देवानंद सानप :
बुलढाणा : रोजच्याच अति पावसामुळे लोणार तालुक्यातील भुमराळा, वझर आघाव, येथील शेतकऱ्यांच्या मुग, उडीद, कपाशी, सोयाबीन, सह इतरही पिकांचे सततच्या पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्या सह तालुक्यात सतत पाऊस पडत आहे सध्यास्थितित शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाचे पीक तोडणीला आले असून या पावसामुळे मुगाच्या उभ्या पिकातील शेंगालाच कोंब फुटले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
सततच्या पावसाने शेतकर्यांना वेठीस तर धरले आहे पण जेरीसही आणले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कपाशी, तुर, मुग, उडीद, या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे अक्षरशः पिके पिवळी पडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे भुमराळा सह परिसरातून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भूमराळा, वझर शिवारात मुग, उडीद पिकाचे पंचनामे सुरू केले आहेत मात्र याच बरोबर सोयाबीन, कपाशी, तुर, सह इतरही पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या ही पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
भुमराळा सह वझर आघाव शिवारात दिनांक 29 /08 /रोजी मुग, उडीद पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत यावेळी कृषी सहाय्यक दिलीप शिंगणे, तलाठी डोईफोडे, ग्रामसेवक राठोड, सह गावातील शेतकरी विलास मापारी, गजानन मोरे, रामभाऊ टेकाळे, भगवान मोरे, रामेश्वर मोरे, संदीप मोरे, सह इतरही शेतकरी उपस्थित होते