आरोग्य विभागाच्या तत्परतेने गाव कोरोना प्रसारापासून बचावले
आर्वी : तालुक्यातील जळगाव (बेलोरा) येथे २२ जुलै रोजी कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये कमालिची दहशत निर्माण झाली होती, परंतु आरोग्य विभागाच्या समय सूचकतेने गाव कोरोना प्रसारा पासून बचावले.
[ads id="ads1"]
सदर सविस्तर वृत्त असे कि, गावातील महिला विनापरवाना बाहेर गावी कार्यक्रमाला जाऊन गावात परत आली, परंतु हि बाब आरोग्य सेवक शिंगणे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेची चौकशी केली, चौकशी दरम्यान त्या महिलेचा नेरपिंगळाई येथील भाऊ कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य सेवक यांनी संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन केले व संबंधित माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ कवरासे मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली, डॉ कवरासे यांनी ताबडतोब त्या महिलेला तपासणी करिता आर्वी येथे पाठिविले असता त्या महिलेची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली.
त्यानंतर पुढील उपचारासाठी सदर महिलेला वर्धा येथे पाठविण्यात आले. व गावातील त्यांच्या घराजवळील परिसर निर्जंतुकीकरण करून काही दिवसांसाठी सील करण्यात आला, आरोग्य सेवक शिंगणे यांच्या समय सूचकतेने गावात कोरोनाचा प्रसार होण्यास बचाव झाला असून गावकऱ्यांनी सुटकेचा स्वास घेतला असच म्हणावं लागेल.
