आता लग्नसमारंभ साठी मंगल कार्यालयास परवानगी ..अशी असेल अट

आता लग्नसमारंभ साठी मंगल कार्यालयास परवानगी ..अशी असेल अट


आता लग्नसमारंभ साठी मंगल कार्यालयास परवानगी ..अशी असेल अट 

केवळ  50 व्यक्तीच्या उपस्थितीस मान्यता
परवाणगीचे अधिकार तहसिलदारांना

वर्धा:  कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हयात मंगलकार्यालयाना लॉक डाऊन केले होते. त्यामुळे अनेकांना त्यांचे लग्न घरच्याघरी कमी उपस्थितित उरकावे लागले.  मात्र जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आता ५० व्यक्तींच्या उपस्थितीत मंगलकार्यालायात लग्न करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय  मालकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन  सुरू केले. त्यामुळे गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद ठेवण्यात आलेत. हळूहळू लॉकडाऊन  उघडताना शासनाने अनेक दुकाने व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र काही व्यवसाय अद्यापही बंद आहेत. यामध्ये  मंगलकार्यालयांचा समावेश होता.

शासनाने  विवाह करण्यासाठी ५० लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी  मंगलकार्यालायत ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी  तहसिलदार तथा ईन्सिडन्ट कंमाडर यांना  विवाहासाठी परवाणगी  देण्याचे अधिकार दिले आहेत.   अटी व शर्तीच्या अधीन राहून  परवाणगी देण्यात येईल अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ व इतर संबंधीत कायदे  व नियम यांचेअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.


वर व वधु हे दोन्ही पक्ष वर्धा जिल्हयातील असतील  तेव्हा  विवाहाकरीता  ५०  व्यक्तींच्या  उपस्थितीसाठी परवाणगी मिळणार आहे. बाहेर जिल्हयातून जो पक्ष विवाहासाठी  वर्धा जिल्हयात येत  असेल अशा वेळी बाहेरील जिल्हयातुन केवळ १० व्यक्तीं जिल्हयात येऊ शकतील. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना  विवाहकरीता येण्यास  परवाणगी देण्यात येणार नाही. तसेच विवाहाकरीता ५ लोकाचे बँडपथक वापरता येईल.

यासाठी मंगलकार्यालयांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.  सर्व प्रकारची मंगल कार्यालये सकाळी  ५ ते ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. मंगल कार्यालय उघडल्यानंतर  तसेच हाताळण्यात येणा-या सर्व वस्तुचे  निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालयाचे कांऊटर दर तीन तासांनी  निर्जंतुकीकरण  करण्यात यावे. सर्व मंगल कार्यालय चालक , मालक  यांनी नेहमी  वापरात येणा-या कामाच्या जागा  हया वारंवार  स्वच्छ  व  निर्जंतुकीकरण कराव्यात. 

दर्शनी भागात हात  धुण्यासाठी  सॅनीटायझर किंवा  लिक्वीड सोपची, तसेच  तापमान  नोंद मशीनची व्यवस्था करावी.  मंगल कार्यालयाचे आवारामध्ये सामाजिक अंतर नियम पाळावे.  मंगल कार्यालयाच्या देखरेखीच्या कामा करीता १० कर्मचारी, मजूर ठेवता येईल.

मंगल कार्यालयातील कर्मचारी यांनी  देखील  लोंकाचा संपर्क टाळावा व त्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात. सर्व कर्मचारी यांनी हात मोजे, मास्कचा नियमित वापर करावा.  आवश्यकता भासल्यास तसेच कोरोना संभाव्य लक्षणे  आढळल्यास तात्काळ  सबंधीत  कर्मचारी , कामगारांनी वैद्यकिय तपासणी करावी. आजारी व्यक्तींना कामावर ठेऊ नये.

मंगल कार्यालयामध्ये  कोरोना  विषाणुचा संसर्गापासुन बचाव करण्यासाठी जनजागृती पर  सूचना फलक  दर्शनी भागात लावावा. 

आवारामध्ये  थुकन्यास प्रतिबंध करण्यात यावे. (विशेष करुन तंबाखू, गुटखा, सेवन करुन) कोविड १९ आजाराचे निदान करणा-या जवळच्या मान्यताप्राप्त  दवाखाने हॉस्पीटलची यादी संपर्क क्रमांकासह  मंगल कार्यालयाच्या ठिकाणी सदैव उपलब्ध करुन दयावी.

मंगल कार्यालयामध्ये गदी वाढल्यास व सूचना देऊनही  गर्दी करीत असल्यास  मंगल कार्यालय चालक व मालकांनी  तात्काळ पोलिस विभागाशी  संपर्क करुन  माहिती दयावी.  व मंगल कार्यालय बंद करावे. मंगल कार्यालयामध्ये गर्दी आढळून आल्यास  मंगल कार्यालय पुढील सात दिवस सिल करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.
Previous Post Next Post