थोरल्या भावाने धाकटयाच्या केला खून
कारंजा तालुक्यातील खरसखांडा येथील थरारक घटना
सावत्र भाऊ असल्याने लहान भावाचा नेहमी राग करायचा
प्रतिनिधी गौरव सोमकुंवर :
कारंजा :- कारंजा तालुक्यातील खरसखांडा येथे सावत्र मोठया सावत्र भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे आठ दिवसांपूर्वी दोघांच्याही लहान मूलाचा किरकोळ वाद झाला होता याच कारणावरून आरोपी रवीशंकर अशोक नासरे याने मनात राग धरून ठेऊन काल दि. १५ च्या रात्री ११ वाजता च्या सुमारास घराबाहेर उभा असलेल्या मृतक सुशील अशोक नासरे (३९) सोबत वाद केला वाद करत असताना वादात लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केला.
हल्ल्यात मृतक हा खाली कोसळूला गंभीर जखमी झाल्याने सुशीलला त्याच्या नातलगांनी कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आहे सदर आरोपी रवीशंकर अशोक नासरे हा काल रात्री पासून घटनास्थळावरून रात्री पसार झाला होता
आज सकाळच्या सुमारास पोलीस कर्मचारी विनोद वानखेडे व नितेश वैध यांनी खरसखंडा शेतशिवरात शोध घेतला असताना त्याला शेतात अटक करण्यात आली आहे आरोपीच्या वडील याना पहिल्या पत्नी पासून रवीशंकर व दुसऱ्या पत्नी पासून सुशील व एक मुलगी आहे आरोपी रवीशंकर नेहमी हा काही तरी वाद हा सुशील याच्या घरच्यांशी घालत असायचा असे सांगण्यात आले आहे सुशील याना सहा वर्षचा अठरा महिन्याचा असे दोन मुलं आहे आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे ठाणेदार राजेंद्र शेटे ,यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि बबन मोहदूले , निलेश मुंडे,प्रफुल्ल माहुरे, उमेश खामनकार करीत आहे