
अमरावती : एका मयत महिलेसह चार महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह
अमरावती : येथील एका मयत महिलेसह एकूण चार महिलांचे कोरोनाव्हायरस चाचणी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तारखेडा येथील 23 एप्रिलला सकाळी निधन झालेल्या एका महिलेची (वय 40) होम डेथ झाल्यानंतर स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
त्याच प्रमाणे कमिला ग्राउंड येथे एका महिलेचे निधन होते त्यांच्या संपर्कातील ४० वर्षे 35 वर्षे व २० वर्षे असे वय असलेल्या तीन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी केवळ १ तासापूर्ती मर्यादित
शहरातील चार कोरोना बाधीत रुग्णांची आज कोविड 19 रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती त्यानंतर शहरात केवळ 2 कोरोना बाधीत त्यांच्यावर ही उपचार सुरू होते परंतु शहराची संख्या 2 वर येताच लगेच दुसरी धक्कादायक बातमी समोर आली त्यामध्ये तब्ब्ल चार कोरोना पोझेटिव्ह रुग्णांची संख्या समोर आली.