लाॅकडाऊन मुळे हरवला थंड ज्युस कोकाकोला थम्सअपचा गोडवा

थंड ज्युस कोकाकोला थम्सअपचा गोडवा I Cold Drink

लाॅकडाऊन मुळे हरवला थंड ज्युस कोकाकोला थम्सअपचा गोडवा   

प्रतिनिधी देवानंद सानप :

बुलडाणा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र उद्योग धंदे ठप्प आहेत याचा मोठा फटका थंड ज्युस व्यावसायिकांना बसत असुन ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर व्यवसाय  सुरु  करण्यापुर्वीच अनेकांना दुकानांना टाळे ठोकावे लागले आहे. 

थंड ज्युस कोकाकोला थम्सअप ऊसाचा रस दरवर्षी जीवनात येणारा थंडा गोडवा हरवला गेला आहे मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्यातील तीन महिने थंड पिण्याच्या साठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात च नियोजन करून शहरात गदीच्या ठिकाणी दुकान साठी जागा निश्चित केली जाते विशेष म्हणजे त्यासाठी  कुठे चार तर पाच हजार रुपये भाडे देऊन गाळे करारबद्ध केले जातात.

उन्हाळ्यात नैसगिक पेय म्हणून थंडा ज्यूस, कोकाकोला थम्सअप, ऊसाचा रस याची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे हे मासिक भाडे भरणे त्यांना फारसे जडत जात नाही पण यावर्षी या व्यावसायीकांच्या  नशिबाचे चक्र पार उलट फिरत आहे कारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला बुलडाणा जिल्ह्यासाह राज्यात अनेक ठिकाणी  पावसासह गारपीट झाली होती त्यामुळे अनेक दिवसांपार्यत वातावरणात गारवा कायम होता त्यामुळे अनेकांनी भाड्याने दुकाने घेऊनही थंडा कोकाकोला थंमसप व्यवसाय सुरू केला नाही.

तर ज्यांनी थंडा कोकाकोला थमसप सुरू केली त्यांच्या कडे फारसे ग्राहक फिरकले नाहीत हे संकट कमी होते की काय म्हणून मार्च महिना अर्धा उलटत नाही तोच राज्यात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली परिणामी लाॅकडाडन घोषित करावे लागले.  

पर्यायाने व्यवसाय मोडीत निघाला आहे कमाई शुन्य असतानाही दुकानांचे भाडे भरण्याचे संकट त्यांत्यावर ओडवले आहे या व्यवसाय मधून कमाई तर सोडाच पण कुटुंबाला पोसण्यासाठी पैसा ही शिल्लक राहिला नाही अशी सध्याची परिस्थिती होऊन बसली आहे. 

Previous Post Next Post