
वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यस्थान मध्ये अडकले
-लाॅकडाऊनचा फटका, पालक चिंतेत, एक टमाटर खाऊन काढत आहे दिवस.
वर्धा : जिल्ह्यातील जळगांव (बेलोरा) येथील दोन व मुळचा वर्धमनेरी हल्ली मुक्काम वर्धा येथील एक असे तिन विद्यार्थी राजस्थान कोटा येथे नेट परीक्षेच्या शिकवनी करीता मागील एक वर्षापासुन गेले आहे त्यांच्या गावाकडे येण्याच्याच दिवसात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आल्याने ते राजस्थान कोटा येथे अडकुन पडली असुन गावाकडे येण्याकरीता व्याकुळ झाली असुन त्यांचे कुटुंबीय चिंतीत पडले आहे.
तरी राजस्थान सरकारने त्यांना घरी जाण्यास परवानगी देवुन तशी व्यवस्था निर्मान करावी अशी मागनी पालकांनी केली आहे. जळगांव (बेलोरा) येथील ऋत्विक त्र्यंबक संभे व भुषण गंगाधर वानखडे तसेच मुळचा वर्धमनेरी हल्ली मुक्काम वर्धा येथील पायस संजय इटकीकर हे तिनही विद्यार्थी वर्ग १२ वीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम. बी. बी. एस ला प्रवेश मिळण्याकरीता नेट परीक्षेच्या शिकवनीकरीता राजस्थान येथील कोटा येथे मागील एक वर्षापासुन गेले आहेत.
ते तेथील वस्तिगृहात वास्तव्यास आहे. त्याच्या गावाकडे परत येण्याच्याच दिवसात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याकरीता देशात सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आल्याने सर्वच वाहतुक सेवा बंद आहे. आता अजुन ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याने अडकुन पडले आहे ते गावाकडे येण्यास व्याकुळ झाले असुन त्यांच्या सयंमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतीत पडले आहे.
ज्या प्रमाने उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात व उत्तराखंड राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी आणण्याकरीता त्या राज्यातील सरकारने ज्या प्रकारे व्यवस्था केली तशीच व्यवस्था महाराष्ट्र सरकारने करावी असी मागनी पालक संजय इटकीकर, वर्धा, त्र्यंबक संभे, गंगाधर वानखडे , जळगांव (बेलोरा) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुनिल केदार, जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा पोलीस अधिक्षक वर्धा यांचे कडे केली आहे.