अमरावती येथे नव्याने 3 पुरुष व्यक्ती पॉझिटिव्ह एकूण संख्या 19
अमरावती, दि. 25 : अमरावती येथे नुकत्याच प्राप्त झालेल्या 13 अहवालांपैकी एका निधन झालेल्या पुरुष व्यक्तीसह 3 पुरुष व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
युसुफनगर येथील 52 वर्षांची पुरुष व्यक्तीला कोविड रूग्णालयात उपचारासाठी 23 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
तारखेडा येथील 23 एप्रिल रोजी निधन झालेल्या महिलेच्या संपर्कातील व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या 33 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तिसरी पुरुष व्यक्ती नूरनगर, जुनी वस्ती, बडनेरा येथील असून, 53 वर्षीय आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, विलगीकरण, थ्रोट स्वॅब घेणे, एरिया सील करणे आदी प्रक्रिया होत आहे.
यानुसार, अमरावती येथे अद्यापपर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची एकूण संख्या 19 झाली आहे. त्यातील मयत व्यक्तींची संख्या 6, दाखल व्यक्तींची संख्या 9 व बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या 4 आहे.