नरभक्षी वाघीण, वनविभाग आणि राजकारण?


    चंद्रपूर जिल्हातील नरभक्षी वाघिणीने महिला तसेच गावातील पाळीव जनावर मारल्या नंतर शेवटी लोकांच्या दबावापुढे वनविभागाने त्या वाघिणीला वर्धा जिल्ह्याच्या बोर व्याघ्रप्रकल्पात आणून सोडले. परंतु ह्या वाघिणीची नरभक्षी सवय काही मोडली नाही. 
      कोंडाळी , कारंजा घाडगे परिसरात सुद्धा ह्या नरभक्षी वाघिणीने धुमाकूळ मांडून येथील पाळीव जनावरे नष्ट करणे सुरु केले. परंतु वनविभागाने त्या वाघिणीला कॉलर आयडी बसवून सुद्धा तिला पकडण्यात यांना यश आलेले नाही. रात्रं दिवस पाळत असलेली हि वाघिणी परिसरात आपली दहशत पसरवत सुटली आहे. 
शेवटी काल आष्टी परिसरात एका शेतकऱ्याच्या नरडीचा घोट तिने घेतलाच. 
     मात्र वनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा असून सुद्धा त्या नरभक्षी वाघिणीवर काबू मिळविता आला नाही. अजून किती लोकांना ह्या वाघिणीमुळे जीव गमवावा लागेल हा प्रश्नच उभा ठाकला आहे.
वनविभागाने तिला जेवढी सुरक्षा दिली आहे तेवढी सुरक्षा राज्याच्या वनमंत्री यांना सुद्धा नसेल हेही तेवढेच अधोरेखित सत्य आहे. 
        एकीकडे वाघ वाचाविण्याच्या चक्कर मद्ये निरपराध निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे.  याच्या पेक्षा महाभयंकर पाप वनविभागाकडून कोणते अपेक्षित राहील? जर हा गुन्हा वाघीण करत असेल तर त्याची शिक्षा एकतर वनविभागवर खटला रचून करायला पाहिजे किंवा त्या वाघिणीला जिवंत ठेवा म्हणाऱ्या वन्यजीवप्रेमी संस्थावर कार्यवाही करायला पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. 

      आष्टी तालुक्यातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वनविभाने तातडीची मदत म्हणून आठ लक्ष रुपयाचा धनादेश सुद्धा दिला परंतु परिसरात चर्चेचा विषय ठरला धनादेश दिला कोणी?  आर्वीचे आमदार अमर काळे यांनी वनविभागाकडे पाठपुरावा करून तातडीने धनादेश आणला परंतु आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी तो पीडित कुटुंबियांच्या स्वाधीन केला.. परंतु चेक कुणीही जरी आणला तरी शासनाची रकमेचा तो धनादेश होता हे हि लोकांनी लक्षात ठेवायला हवे. आर्वीच्या राजकारणात पूर्वी पासूनच (विधानसभा २००९ ) श्रेय लाटण्याचे राजकारण सुरु आहे. शासन स्तरावरून मंजुरी मिळून आणली कि श्रेय लाटण्याचे राजकारण सुरु? असे काहीसे चित्र काल सुद्धा पाहावयास मिळाले. 
           मरणारा मरतो आणि राजकीय व्यक्ती  व कार्यकर्ते राजकारानाची पोळी भाजणे सुरु करते याला कुठे तरी आळा बसायला हवा. 


-धिरज मानमोडे 
मुख्य संपादक, कृषीप्रधान मीडिया 


Previous Post Next Post